तिच्या स्टायलिश अदाकारीची झलक
भारतीय पुरुष क्रिकेटरच नाही तर महिला क्रिकेटमध्येही स्टायलिश क्रिकेटरची कमी नाही. हा फोटो त्याचाच एक पुरावा आहे.
हा फोटो पाहिल्यावर ही एखाद्या चित्रपटातील हिरोईन आहे की, काय? असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो.
पण ही पिक्चरमधील नव्हे तर टीम इंडियातील हिरोईन आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानात कडक अर्धशतकी खेळीसह तिन मैफिल लुटलीये.
हरलीन देओलही क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय आपल्या हटके अन् स्टायलिश अंदाजातील खास लूकनंही लक्षवेधून घेत असते.
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टायलिश क्रिकेटरमध्ये ती सर्वात आघाडीवर असणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून बोल्ड अन् ब्युटीफूल फोटो शेअर करत ती चाहत्यांना क्लीन बोल्ड करताना दिसले आहे.
सातत्याने ती आपल्या स्टायलिश अंदाजाची खास झलक दाखवून देत असते.
पारंपारिक अंदाजातील तिचा लूकही एकदम भारी वाटतो.