पांड्याचा स्वॅग; किंग कोहलीला टाकले मागे, इथं पाहा खास रेकॉर्ड

या खास यादीत हिटमॅन रोहित टॉपला

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूरच्या मैदानातील टी-२० सामन्यात हार्दिक पांड्याने मोठा डाव साधला आहे.

भारताकडून सर्वाधिक टी-२० सामने खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने किंग कोहलीला मागे टाकत तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. 

हार्दिक पांड्याने आतापर्यंतच्या आपल्या T20I कारकिर्दीत १२६ सामने खेळले आहेत.

विराट कोहलीनं २०२४ पर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत भारताकडून १२५ टी-२० सामने खेळल्याचा रेकॉर्ड आहे.

या यादीत रोहित शर्मा सर्वात १५९ आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यासह सर्वात अव्वल स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून फक्त चार खेळाडूंनीच शंभर सामने खेळले आहेत.

सूर्यकुमार यादवनं न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतच शंभरीचा आकडा पार केला.

Click Here