क्रिकेटरच्या आयुष्यात नवी गर्लफ्रेंड?
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू हार्दिक पांड्यानं आता मॉडेल माहिका शर्मासोबत डेटिंगचा खेळ सुरु केलाय अशी चर्चा रंगू लागली आहे.
क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय पांड्या अनेकदा फिल्डबाहेरील लव्ह अफेयर्सच्या गोष्टींमुळे चर्चेत राहिलाय.
इथं एक नजर टाकुयात क्रिकेटरसोबतच्या डेटिंगमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रींवर....
अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यासोबतही पांड्याचे नाव जोडले गेले. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले. दोघांनीही नात्याला मैत्रीचा टॅग लावत विषय संपवला.
अभिनेत्री ईशा गुप्ताही क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. दोघांनी कधीच नात्यासंदर्भातील चर्चेला दुजोरा दिला नाही.
गायिका, अभिनेत्री, होस्ट आणि मॉडेल अशी ओळख असलेल्या शिबानी दांडेकरसोबतही हार्दिक पांड्याचे नाव जोडले गेले. ही गोष्ट गॉसिपच राहिली.
अभिनेत्री अली अवराम ही देखीलपांड्याच्या लव्ह स्टोरीच्या चॅप्टरचा एक भाग राहिलीये. २०१८ मध्ये ही जोडी फुटल्याची चर्चाही गाजलीये.
२०१६ मध्ये लीशा शर्मा या मॉडेलसोबत हार्दिक पांड्याचे सूत जुळल्याची चर्चा रंगली. क्रिकेटरनं तिच्यासोबत ब्रेकअप झाल्याचेही सांगितले होते.
नताशा स्टँकोविचसोबतचा डेटिंगचा खेळ प्रेमात रुपांतरित झाला. पांड्याने एकदा नव्हे तर दोनदा तिच्याशी लग्न केले. पण शेवटी दोघांनी घटस्फोट झाला.