गुरुवर्यांना मानाचा मुजरा...! स्टार क्रिकेटर्सच्या यशामागचा चेहरा

स्टार इंडियन क्रिकेटर्स अन् त्यांचे कोच

दिवंगत क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांचे भारतीय क्रिकेटमध्ये बहुमूल्य योगदान राहिले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीसह त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक क्रिकेटर्स घडले.

गुरुवर्य रमाकात आचरेकर सरांच्या तालमीत तयार झालेला सचिन तेंडुलकर  हा क्रिकेट जगतात विक्रमादित्य ठरला.

राजकुमार शर्मा हे विराट कोहलीचे गुरु (कोच) आहेत. आजही गरज भासली तर कोहली त्यांच्याकडून टिप्स घेतो.

क्रिकेट जगतातील माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला घडवण्यात त्याचे गुरवर्य एएन शर्मा यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. 

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे स्टार क्रिकेटर्स गुरवर्य दिनेश लाड यांच्या तालमीत तयार झाले.

कोच केशव रंजन बॅनर्जी यांनी फुटबॉलची ओढ असणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला क्रिकेटच्या रुपात घडवले.

Click Here

Your Page!