क्रिकेटच्या मैदानातील मराठमोळ्या जोडीसंदर्भातील खास स्टोरी
भारतीय संघाचा युवा स्टार क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याची पत्नी उत्कर्षा पवारही एक प्रोफेशनल क्रिकेटर आहे.
कमालीचा योगायोग म्हणजे आणखी एका पुणेकर अन् टीम इंडियाकडून खेळणाऱ्या खेळाडूच्या बायकोनं क्रिकेटचं मैदान गाजवलंय
तो मराठमोळा क्रिकेटर म्हणजे केदार जाधव. या पुणेकराची बायकोही क्रिकेटर होती. जाणून घेऊयात तिच्यासंदर्भातील सविस्तर माहिती
केदार जाधवच्या बायकोचं नाव स्नेहल जाधव असं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनीधीत्व केले आहे.
२०११ मध्ये केदार जाधवसोबत लग्न उरकल्यावर स्नेहलनं २०१५ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
स्नेहल सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय दिसते. गेलसोबत तिने शेअर केलेला हा फोटोही चांगलाच चर्चेत आला होता.