किंग कोहली अव्वलस्थानी आहे, पण..
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या यादीत भारतीय संघातील दोन खेळाडू संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहेत.
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहलीनं न्यूझीलंडविरुद्ध वनडेत प्रत्येकी ६-६ शतके झळकावली आहेत.
नव्या वर्षातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विराट कोहली एका शतकासह या यादीत अव्वलस्थानी विराजमान होऊ शकतो.
सचिन तेंडुलकरनं न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत ४२ सामन्यात ५ शतके आणि ८ अर्धशतकासह १७५० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं आपल्या कारकिर्दीत न्यूझीलंडविरुद्ध ३२ वनडेत ३ शतके झळकावली आहेत.
रोहित शर्मानं न्यूझीलंडविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या २९ डावात दोन शतके झळकावली आहेत.
भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार शुभमन गिल याच्या बॅटमधून न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत १२ डावात दोन शतके पाहायला मिळाली आहेत.
श्रेयस अय्यरशिवाय गौतम गंभीर, राहुल द्रविड या दिग्गजांनीही वनडेत न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी २-२ शतके ठोकली आहेत.