वर्ल्ड कपमधील 'सिक्सर किंग'...
न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये तुफान फटकेबाजीचा खास नजराणा पेश केला.
अवघ्या ३३ चेंडूत नाबाद शतक झळकावत संघाला फायनलचं तिकीट मिळवून देताना त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.
टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावताना त्याच्या बॅटमधून ८ षटकार पाहायला मिळाले.
या डावातील ८ षटकारांसह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे.
यंदाच्या हंगामात फिन ॲलनने आतापर्यंत २० षटकार ठोकले आहेत. एका हंगामात सर्वाधिक षटकारासह तो टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नवा षटकार किंग ठरलाय.
यंदाच्या हंगामातच कॅरेबियन स्फोटक बॅटर शिमरॉन हेटमायरनं १९ षटकार ठोकले आहेत.
पाकिस्तानचा साहिबजादा फरहान २०२६ च्या हंगामातील १८ षटकारांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
२०२४ च्या हंगामात निकोलस पूरन याने १७ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
ख्रिस गेलनं २०१२ च्या हंगामात १६ षटकार ठोकल्याचे पाहायला मिळाले होते.