या यादीत युवराज सिंग आहे टॉपला
शिवम दुबेनं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी करताना खास विक्रमाला गवसणी घातली.
भारतीय संघाकडून T20I मध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहचला.
विशाखापट्टणमच्या मैदानात शिवम दुबेनं १५ चेंडूत अर्धशतक साजरे केले. या खेळीसह त्याने हार्दिक पांड्याला मागे टाकले.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सर्वात जलद अर्धशतकी खेळीचा विक्रम हा युवराज सिंगच्या नावे आहे.
युवराज सिंगनं २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध डरबनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात फक्त १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
न्यूझीलंडविरुद्धच्या गुवाहाटीच्या मैदानातील सामन्यात अभिषेक शर्मानं १४ चेंडूत अर्धशतक झळकवल्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला.
गत वर्षाअखेर हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत अहदाबादच्या मैदानात अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.
आघाडीच्या पाच जलद अर्धशतकी खेळीत अभिषेकचे नाव दोन वेळा दिसते. २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध वानखेडेच्या मैदानात त्याने १७ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.