पायाला फॅक्चर असताना मैदानात उतरुन रचला नवा इतिहास
इंग्लंडच्या मैदानात त्याच्या भात्यातून नवव्यांदा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी पाहायला मिळाली. यासह त्याने धोनीचा विक्रम मोडला आहे.
महेंद्रसिंह धोनीनं आपल्या कसोटी कारकिर्दीत विकेट किपर बॅटरच्या रुपात इंग्लंडच्या मैदानात ८ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
रिषभ पंतनं चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत ५ वे अर्धशतक झळकावले.
भारतीय विकेट किपर बॅटरच्या रुपात एका कसोटी मालिकेत सर्वाधिक ५ वेळा ५० प्लस धावा करण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे.
मॉडर्न क्रिकेटमध्ये रिषभ पंत हा एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा विकेट किपर बॅटरही ठरला आहे.
रिषभ पंतनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील ४ सामन्यातील ७ डावात ४७९ धावा केल्या आहेत.
पंतपाठोपाठ इंग्लंडचा माजी विकेट किपर बॅटर ॲलेक जेम्स स्टीवर्ट (४७९), जेमी स्मिथ (४१५) आणि जॉनी बेयर्स्टो (३८७) यांचा नंबर लागतो.