दीप्ती ते लॉरा कुणाला मिळेल सर्वाधिक भाव?
दीप्ती शर्मा WPL मध्ये यूपी वॉरियर्सकडून २५ सामने खेळली आहे. यात तिने २७ विकेट्स आणि ५०७ धावा केल्या आहेत.
मेग लॅनिंग ही WPL इतिहासात सर्वाधिक धावा करणारी तिसरी बॅटर आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून तिने २७ WPL सामन्यांत ९५२ धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया केर WPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी दुसरी गोलंदाज आहे. MI कडून २९ सामन्यांत तिने ४३७ धावांसह ४० विकेट्स घेतल्यात.
ऑस्ट्रेलियन महिला संघाची सर्व फॉरमॅटमधील कर्णधार एलिसा हिलीने यूपी वॉरियर्ससाठी १७ WPL सामन्यांमध्ये ४२८ धावा केल्या आहेत.
इंग्लंडची स्पिनर सोफी एक्लेस्टोन WPL इतिहासात सर्वाधिक बळी घेणारी तिसरी गोलंदाज आहे. UP वॉरियर्ससाठी २५ सामन्यांत तिने ३६ विकेट्स घेतल्यात.
२०२५ च्या महिला वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारी लॉरा वोल्वार्डनं WPL मध्ये गुजरातकडून १३ सामन्यांत ३४२ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्रेस हॅरिसने यूपी वॉरियर्ससाठी २२ WPL सामन्यांL ५८१ धावा केल्या आहेत. याशिवाय तिच्या खात्यात १३ विकेट्स जमा आहेत.
स्नेह राणा WPL मध्ये गुजरात जायंट्स आणि आरसीबी या दोन संघांकडून खेळली आहे. १७ WPL सामन्यांत तिच्या खात्यात १२ विकेट्स जमा आहेत.
प्रतिका रावल आतापर्यंत WPL मध्ये खेळलेली नाही. २०२५ च्या महिला वनडे वर्ल्ड कपनंतर ती मेगा लिलावात लक्षवेधी ठरेल.
भारतीय वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर हिने RCB च्या संघाकडून 23 WPL सामन्यांत १३ विकेट्स घेतल्या आहेत.