झुलन ते दीप्ती! महिला वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स कुणाच्या खात्यात? 

एक नजर खास रेकॉर्ड्सवर

दीप्ती शर्मानं महिला वर्ल्ड कप स्पर्धेचा यंदाचा हंगाम गाजवत सर्वाधिक २२ विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला. 

 दीप्ती शर्मा महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाली आहे.

फायनलमध्ये दीप्ती शर्मानं अर्धशतकी खेळीनंतर पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला. अशी कामगिरी करणारी ती पहिली खेळाडू ठरली.

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा झुलन गोस्वामीच्या नावे आहे. तिने ३४ सामन्यात ४३ विकेट्स घेतल्या आहेत. 

 दीप्तीनं २०२५ च्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरीसह  वर्ल्ड कप स्पर्धेतील २३ सामन्यात आपल्या खात्यात ३६ विकेट्स जमा केल्या आहेत.

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज डायना एडुलजी यांच्या खात्यात २२ सामन्यात ३१ विकेट्सची नोंद आहे.

नीतू डेविड यांनी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत २० सामन्यात ३० विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

पूर्णिमा राव या भारताच्या माजी गोलंदाजाच्या खात्यात १९ वर्ल्ड कप सामन्यात ३० विकेट्स जमा आहेत.   

Click Here