जगात भारी ठरलेल्या 'चारचौघीं'मध्ये भारताची दीप्ती 

दीप्तीनं साधला विक्रमी डाव, जाणून घ्या सविस्तर

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या इंदूरच्या मैदानातील सामन्यात दीप्ती शर्मानं चार विकेट्सचा डाव साधला. 

या सामन्यात टॅमी ब्युमाँटची विकेट घेताच दीप्तीनं १५० विकेट्सचा टप्पा पार केला. 

या कामगिरीसह दीप्ती शर्मा ही  २००० धावा आणि १५० विकेट्स घेणारी महिला क्रिकेट जगतातील चौथी खेळाडू ठरली आहे.

इथं एक नजर टाकुयात दीप्तीसह महिला वनडे क्रिकेटमध्ये २००० धावा आणि १५० विकेट्सचा डाव साधणाऱ्या खेळाडूंवर...

ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीनं आपल्या कारकिर्दीत ४४१४ धावांसह १६६ विकेट्स घेतल्या आहेत. 

वेस्ट इंडिजची  स्टेफनी टेलर हिच्या खात्यात ५८७३ धावांसह १५५ विकेट्सची नोंद आहे. 

दक्षिण आफ्रिकेच्या मेरिझॅन कॅप हिने ३३९७ धावांसह १७२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. 

Click Here