'किलर' मिलर टीम इंडियाविरुद्ध ठरला नवा 'सिक्सर किंग'

ग्लेन मॅक्सवेलचा विक्रम मोडला

द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात डेविड मिलरनं संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

डेविड मिलरनं ३५ चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी करताना ७ चौकार आणि ३ षटकार मारले. 

या खेळीत त्याने टीम इंडियाविरुद्ध सिक्सर किंग होण्याचा खास वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये डेविड मिलरनं टीम इंडियाविरुद्ध २६ डावात ३९ षटकार मारले आहेत. 

या यादीत ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने टीम इंडियाविरुद्ध २२ डावात ३८ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

निकोलस पूरन याने भारताविरुद्ध २० डावात ३५ षटकार ठोकले आहेत. 

श्रीलंकेचा दसुन शनाका याने २३ डावात टीम इंडियावरिुद्ध ३० षटकार मारले आहेत. 

वेस्ट इंडिजच्या एविन लुईस याने फक्त ८ डावात टीम इंडियाविरुद्ध २८ षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले आहे. 

टीम इंडियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात  केरॉन पोलार्डनं १३ डावात २७ तर बटलरनं २४ डावात २७ षटकार मारले आहेत. 

Click Here