कुणी मारला सर्वात लांब सिक्सर? टॉप ७ मध्ये तिलक अन् शिवम दुबेचंही नाव 

एक नंबरच्या बॅटरनं किती लांब मारलाय सिक्सर? जाणून घ्या सविस्तर

बांगलादेश विरुद्ध श्रीलंकेच्या ताफ्यातील दसुन शनाकानं अर्धशतकी खेळीत दोन उत्तुंग षटकार मारले. यातील एक षटकार १०१ मीटर एवढ्या लांब मारला.

आशिया कपमध्ये सर्वात लांब षटकार मारणाऱ्या बॅटरमध्ये ओमरझाई ९९ मीटरसह दुसऱ्या  आणि ९३ मीटर षटकारसह पाचव्या क्रमांकावर दिसतो.

तिलक वर्मानं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मुकीमला ९८ मीटर लांब षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.

हाँगकाँगच्या बाबर हयातनं अफगाणिस्तानविरुद्ध करीम जनतच्या गोलंदाजी ९३ मीटर लांब षटकार मारला होता.


शाहीन शाह आफ्रिदीनं पांड्याच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार ९१ मीटर लांब जाऊन पडला होता.



मोहम्मद हॅरीसनं ओमान विरुद्धच्या सामन्यात श्रीवास्तवच्या गोलंदाजीवर ९० मीटर लांब षटकार मारला होता.




शिवम दुबेनं पाकविरुद्धच्या सामन्यात सईम अयूबच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार हा ९० मीटर लांब अंतरावर जाऊन पडला होता.

Click Here