सचिन ते मिताली! स्टेडियमवरील नावासह सन्मानित ११ भारतीय 

क्रिकेटर्सच्या सन्मानाची गोष्ट

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील एका स्टँडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले आहे. 

दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर मॉडर्न क्रिकेटमधील सर्वोत्तम बॅटर विराट कोहलीच्या नावाने पॅव्हेलियन आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये लिटल मास्टर सुनील गावसर यांच्या नावाचे पॅव्हेलियन आहे.

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील एका पॅव्हेलियनला व्हीव्ही एस लक्ष्मणचं नाव देण्यात आले आहे.

 दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या एका गेटला नाव देत  विरेंद्र सेहवागचा सन्मान करण्यात आला होता.

झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या रांची स्टेडियममधील पॅव्हेलियनला MS धोनीचं नाव दिल्याचे पाहायला मिळाले होते.

 मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील एका स्टँडला रोहित शर्माचे नावही देण्यात आले.

कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावाचे स्टँड दिसून येते.

हैदराबादच्या स्टेडियमवरील एका स्टँडला  मोहम्मद अझरुद्दिनचे नाव देण्यात आले आहे. हे नाव हटवण्यावरुन नवा वाद सुरु असल्याचेही पाहायला मिळाले.

आता विशाखापट्टणम येथील स्टेडियमवरील स्टँडला मिताली राज आणि रवी कल्पना रेड्डी या दोन महिला क्रिकेटची नावे पाहायला मिळणार आहेत.

Click Here