कॅप्टन्सीसाठी होती तगडी स्पर्धा, पण..
भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने देशांतर्गत क्रिकेटच्या नव्या हंगामाची सुरुवात होण्याआधी मुंबई संघाचे नेतृत्व सोडले आहे.
अजिंक्य रहाणेनंतर मुंबई संघाचा नवा कर्णधार कोण? ही चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागलीये.
श्रेयस अय्यरचं नाव चर्चेत असताना आता आणखी एक स्टार खेळाडू या शर्यतीत आला आहे.
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, अजिंक्य रहाणेच्या जागी MCA शार्दुल ठाकूरच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे.
याआधी देशांतर्गत क्रिकेटमधील दुलिप करंडक स्पर्धेत शार्दुल ठाकुर याची पश्चिम विभाग संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली होती.
त्यानंतर आता मुंबईच्या संघाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत त्याने बाजी मारल्याचे दिसते.
श्रेयस अय्यरशिवाय सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि सरफराज या स्टार खेळाडूंचे पर्याय असताना MCA शार्दुलला पसंती दिल्याचे समजते.