इथं जाणून घ्या खास रेकॉर्ड
ख्रिस गेलनं २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११७ तर २०१६ च्या हंगामात इंग्लंड विरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती.
भारताकडून सुरेश रैनानं २०१० च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०१ धावांची खेळी केली केल्याचा रेकॉर्ड आहे.
२०१० च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धने याने झिम्बाब्वे विरुद्ध शतक साजरे केले होते.
न्यूझीलंडच्या ब्रॅडन मॅक्युलमन याने २०१२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध १२३ धावांची खेळी केली होती.
२०१४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या एलेक्स हेल्सनं श्रीलंकेविरुद्ध ११६ धावांची नाबाद खेळी साकरल्याचा रेकॉर्ड आहे.
पाकिस्तानच्या अहमद शहजाद याने २०१४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध नाबाद १११ धावा काढल्या होत्या.
२०१६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशच्या तमिम इक्बालनं ओमान विरुद्ध नाबाद १०३ धावांची खेळी साकारली होती.
२०२१ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जोस बटलरनं श्रीलंकेविरुद्ध १०१ धावांची नाबाद खेळीसह या खास क्लबमध्ये एन्ट्री मारली.
दक्षिण आफ्रिकेचा रायली रुसो देखील या यादीत आहे. २०२२ च्या हंगामात त्याने बांगलादेिरुद्ध १०९ धावा केल्या होत्या.
२०२२ च्या हंगामात न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सनं श्रीलंकेविरुद्ध १०४ धावांची खेळी केली होती.