List A Cricket : जलद शतक झळकवणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत ३ भारतीय

इथं पाहा शतकी खेळीचा खास रेकॉर्ड

विजय हजारे ट्रॉफी २०२५ स्पर्धेत बिहारचा कर्णधार साकिबुल गनी याने भारताकडून लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोत जलद शतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला.

बिहारचा कर्णधार साकिबुल याने अरुणाचल प्रदेश विरुद्ध २४ डिसेंबर, २०२५ रोजी रंगलेल्या सामन्यात ३२ चेंडूत शतक साजरे केले. 

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियन जेक फ्रेझर-मॅकगर्क याच्या नावे आहे. 

८ ऑक्टोबर २०२३ रोजी जेक फ्रेझर-मॅकगर्क याने तस्मानिया विरुद्ध २९ चेंडूत शतक झळकावले होते. 

एबी डिव्हिलयर्स या यादीत ३१ चेंडूतील शतकासह दुसऱ्या स्थानी आहे. १८ जानेवारी २०१५ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने हे जलद शतक झळकावले होते.

या यादीत इशान किशनचाही समावेश आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५ च्या हंगामातील कर्नाटकविरुद्ध त्याने झारखंडकडून ३३ चेंडूत शतक झळकावले.

पंजाबकडून अनमोलप्रीत सिंगने २१ डिसेंबर २०२४ च्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अरुणाचल प्रदेशविरुद्ध ३५ चेंडूत शतक साजरे केले होते. 

Click Here