जे टीम इंडियानं तीन वेळा करून दाखवलं ते पाकला एकदाही नाही जमलं

इथं पाहा आशिया कप स्पर्धेतील रेकॉर्ड

भारतीय संघाने UAE विरुद्धच्या सामन्यात ९३ चेंडू राखून आशिया कप २०२५ स्पर्धेत विजयी सलामी दिली. 

कमी षटकात सामना संपवत टीम इंडियाच्या नावे आशिया कप स्पर्धेतील सर्वात मोठ्या विजयाची नोंद झाली.

या आधीचा रेकॉर्डही टीम इंडियाच्या नावे आहे. २०१६ च्या टी-२० आशिया कप स्पर्धेत भारताने UAE विरुद्ध ५९ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवलेला.

या यादीत अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. २०२२ च्या हंगामात चमत्कारी संघानं श्रीलंकेला ५९ चेंडू राखून पराभूत करून दाखवले होते.

२०१६ च्या टी-२० आशिया कप स्पर्धेत भारतीय  संघाने पाकिस्तानला २७ चेंडू राखून मात दिली होती. 

२०२२ च्या हंगाामात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला १८ चेंडू राखून पराभूत केले होते. 

टी-२० आशिया कप २०२५ स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने हाँगकाँगच्या संघाला १४ चेंडू राखून मात दिली. 

या यादीत UAE च्या संघाचाही समावेश आहे. २०१६ च्या हंगामात या संघाने हाँगकाँगच्या संघाला ८ चेंडू राखून पराभूत केल्याचा रेकॉर्ड आहे. 

Click Here