आशिया कप स्पर्धेतील खास रेकॉर्ड
टी २० फॉरमॅटमधील आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा भुवनेश्वर कुमारच्या नावे आहे.
आशिया कप स्पर्धेतील ६ टी-२० सामन्यात भुवनेश्वर कुमारनं आपल्या खात्यात १४ विकेट्स जमा केल्या आहेत.
२०२२ च्या हंगामात या पठ्ठ्यानं जेवढ्या धावा खर्च केल्या त्यापेक्षा अधिक विकेट्स घेत सर्वोच्च कामगिरीचाही खास विक्रम नोंदवला होता.
आशिया कप स्पर्धेतील टी-२०त ४ धावा खर्च करून ५ विकेट्स घेत भुवीनं सर्वोच्च कामगिरी केली होती. 'पंजा' मारणारा तो पहिला अन् एकमेव गोलंदाज आहे.
भारतीय गोलंदाजाशिवाय अन्य कुणालाही छोट्या फॉरमॅटमधील आशिया कप स्पर्धेत अशी मोठी कामगिरी करता आलेली नाही.
भुवीशिवाय टी-२० आशिया कप स्पर्धेत चार विकेट्सचा डाव साधणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाकच्या शादाब खानसह ७ गोलंदाजांचा समावेश आहे.
श्रीलंकेच्या लसिथ मलिंगासह मोहम्मद नबी, प्रमोद मदुशंका, आमिर कलीम अन् मोहम्मद नवाझ यांनी टी-२० आशिया कप स्पर्धेत ४ विकेट्सचा डाव साधला आहे.