१० धावांनी काय फरक पडला... बेन स्टोक्सचे गिरो तो भी टांग उपर!
जडेजानं स्टोक्ससोबत हस्तांदोलन करणं टाळलं. यावरून चांगलाच गदारोळ होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. भारतीय संघानं दुसऱ्या डावात झुंजार फलंदाजी केली.
भारताकडून कर्णधार शुभमन गिल पाठोपाठ रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलंच दमवलं.
मात्र ज्यावेळी जडेजा आणि सुंदर शतकाच्या जवळ होती त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सनं सामना थांबवण्याचा प्रस्ताव भारतीय संघासमोर ठेवला होता.
मात्र भारतीय संघानं, जडेजानं तो प्रस्ताव धुडकावून लावला. जडेजानं स्टोक्ससोबत हस्तांदोलन करणं टाळलं. यावरून चांगलाच गदारोळ होत आहे.
आता यावर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया आली आहे. सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्टोक्सनं आधी जडेजा आणि सुंदरच्या बॅटिंगचं कौतुक केलं.
तो म्हणाला, टीम इंडिया अडचणीत सापडली होती. मात्र दोन जबरदस्त भागिदारी झाल्या. त्यांनी झुंजार खेळ केला. अप्रतिम!
स्टोक्सनं कौतुक केलं मात्र त्यानंतर जडेजा आणि सुंदरच्या शतकावरून टोमणा देखील मारायला तो विसरला नाही.
तो म्हणाला संघाला अडचणीतून बाहेर काढत ८०, ९० धावांवर नाबाद राहण्यापेक्षा शतक ठोकून नाबाद राहण्याचा आनंद फार मोठा असतो असं मी मानत नाही.
तुम्ही संघासाठी खेळत असता... त्या १० धावांमुळे तुम्ही संघाला अत्यंत अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढलं हे वास्तव बदलणार नाही असंही स्टोक्स म्हणाला.
स्टोक्सनं एका बाजूला जडेजा आणि सुंदरच्या झुंजार खेळीचं कौतुक केलं. मात्र शतकाच्या उंबरठ्यावर असताना सामना थांवबण्यास नकार देण्यावरून टोमणा देखील मारला.