टीम इंडियाची क्वीन स्मृतीनं केली किंग कोहलीची बरोबरी

इथं पाहा खास रेकॉर्ड

बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात स्मृती मानधना हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटरच्या रुपात सन्मानित करण्यात आले.

स्मृती मानधना हिने सलग दुसऱ्यांदा आणि विक्रमी पाचव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. 

यंदाच्या वर्षी पाचव्या पुरस्कारासह तिने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 

विराट कोहलीनं आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत पाच वेळा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटरसाठी देण्यात येणारा बीसीसीआयचा पुरस्कार जिंकला आहे.

भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आतापर्यंत २  वेळा या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

शुबमन गिलने यंदाच्या वर्षी दुसऱ्यांदा या पुरस्काराचा मानकरी ठरला. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बीसीसीआयकडून देण्यात येणारा वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू हा मानाचा पुरस्कार दोन वेळा जिंकला आहे

आर. अश्विनचाही या यादीत समावेश आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत दोन वेळा हा पुरस्कार जिंकला होता.

Click Here