आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारणारे ६ फलंदाज

बल्गेरियाच्या पठ्ठ्यानं मारली युवीच्या क्लबमध्ये एन्ट्री

बल्गेरियाचा स्फोटक फलंदाज मनन बशीर याने जिब्राल्टर विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात  ६ चेंडूत ६ षटकार मारण्याचा पराक्रम करून दाखवलाय. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारणारा तो सहावा फलंदाज ठरला आहे. इथं एक नजर टाकुयात अशी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांच्या रेकॉर्डवर

दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जनं  २००७ मध्ये नेदरलंडविरुद्धच्या सामन्यात एका षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. 

दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जनं  २००७ मध्ये नेदरलंडविरुद्धच्या सामन्यात एका षटकात ६ षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. 

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्टुअर्ड ब्रॉडच्या गोलंदाजीवर ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. 

कॅरेबियन संघातील स्फोटक बॅटर केरॉन पोलार्डनं २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी करून दाखवली होती. 

अमेरिकेच्या जस्करन मल्होत्रा याने २०२१ मध्ये पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

नेपाळच्या दीपेंद्र सिंह ऐरीनं २०२४ मध्ये कतार विरुद्धच्या लढतीत ६ चेंडूत ६ षटकार मारत दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री मारली होती.

Click Here