रुटच्या विक्रमी शतकावर ग्रेस हेडन झाली फिदा, कारण...
इंग्लंडचा महान फलंदाज जो रुट याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विक्रमी शतक झळकावले.
कसोटी कारकिर्दीत सर्वात कमी वयात ४० व्या शतकाला गवसणी घातल त्याने नवा इतिहास रचला. त्याच्या खेळीवरील ग्रेस हेडनची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
ग्रेस हिने इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून धन्यवाद जो रुट... तू आमच्या डोळ्यांना नको ते पाहण्यापासून वाचवलेस, अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे.
अॅशेस मालिकेत रुटनं शतक झळकावले नाही तर मी विवस्त्र होऊन ग्राउंडची फेरी मारेन, असे बोल्ड वक्तव्य ऑस्ट्रेलियन दिग्गज मॅथ्यू हेडन याने केले होते.
मग ग्रेस हेडन पिक्चरमध्ये आली. तिने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक शतक नक्की कर... अशी विनंती रुटला केली होती.
वडिलांच्या बोल्ड कमेंटच्या पार्श्वभूमीवरच तिने जो रुटच्या शतकी खेळीनंतर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
ग्रेस हेडन ही देखील क्रिकेटशी कनेक्ट असलेला चेहरा आहे. अनेक क्रिकेट स्पर्धेत ती स्पोर्ट्स अँकरच्या रुपात लक्षवेधून घेताना दिसते.
जो रुटच्या विक्रमी खेळीनंतर तिचा आनंद गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे.