तो ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणार का?
शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वनडेतील कॅप्टन्सीच्या नव्या पर्वाची नवी सुरुवात करणार आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना गिलनं खास छाप सोडली होती. वनडेतही तो धमाकेदार कामगिरी करुन दौरा खास करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
इथं एक नजर टाकुयात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेतील शुबमन गिलच्या आतापर्यंतची कामगिरीवर
शुबमन गिलनं आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ सामने खेळले आहेत. यात ३५ च्या सरासहीसह त्याने २८० धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या भात्यातून वनडेत एक शतक आणि एक अर्धशतक आले असून १०४ ही गिलची कागारुंच्या संघाविरुद्धची सर्वोच्च खेळी आहे.
ऑस्ट्रेलियन मैदानात शुबमन गिल आतापर्यंत फक्त एक सामना खेळला आहे. २०२० मध्ये मनुका ओव्हल मैदानात त्याने ३३ धावांची खेळी केली होती.
गिलसाठी हे वर्ष खास राहिले आहे. वनडेत त्याने ८ सामन्यात ६३.८६ च्या सरासरीसह ४४७ धावा केल्या आहेत. ज्यात २ शतकांचा समावेश आहे.