या स्पर्धेत सर्वाधिक सेंच्युरी झळकवणारे ५ फलंदाज
आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक शतके कुणाच्या नावे आहेत? हा प्रश्न विचारला तर अनेकजण सचिन, विराट अन् हिटमॅन रोहित यापैकी कुणाचं तर नाव घेतील.
पण तुम्हाला माहितीये का? आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा दबदबा असला तरी सर्वाधिक शतकाचा रेकॉर्ड हा एका श्रीलंकन बॅटरच्या नावे आहे.
तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे सनथ जयसूर्या. १९९० ते २००८ या कालावधीत या पठ्ठ्यानं आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक ६ शतके ठोकली आहेत.
किंग कोहलीनं २०१० पासून या स्पर्धेत ४ शतके ठोकली असून तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
श्रीलंकेच्या कुमार संगकारानं २००४ ते २०१४ या कालावधीत आशिया कप स्पर्धेत ४ शतके झळकावली आहेत.
त्यानंतर या यादीत पाकिस्तानच्या शोएब मलिकचा नंबर लागतो. १७ सामन्यात त्याच्या खात्यात ३ शतकांची नोंद आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह शाहिद आफ्रिदी, सुरेश रैना, शिखर धवन, युनिस खान आणि मुस्तफिकीर रहिम यांनी प्रत्येकी २-२ शतके झळकावली आहेत.