इथं पाहा T20I मधील खास रेकॉर्ड
टी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या अर्शदीप सिंगनं न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत धाडला.
आपल्या टी-२० कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याने पाच विकेट्सचा डाव साधला. कोणत्याही गोलंदाजासाठी ही कामगिरी अविस्मरणीय असते. पण...
तिरुवनंतपुरमच्या मैदानात न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत धाडताना अर्शदीप सिंगनं ५१ धावा खर्च केल्या.
आपल्या पहिल्या षटकात विकेट्स घेत त्याने पॉवर प्लेमध्ये ५० विकेट्सही पूर्ण केल्या. पण विक्रमी 'पंजा' सगळ्यात महागडा ठरला.
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेताना सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सर्वात टॉपला आहे.
या यादीत वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ दुसऱ्या स्थानी आहे. २०२३ मध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या T20I सामन्यात त्याने ४० धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेच्या लुंगी एनिगडीनं इंग्लंडविरुद्ध ३९ धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.