पंत पाठोपाठ क्रिस वोक्स आधी या पठ्ठ्यानं दाखवली होती हिंमत
ओव्हलच्या मैदानात इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर क्रिस वोक्स गळ्यात हात बांधून बॅटिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
या आधी मँचेस्टर कसोटी सामन्यात उजव्या पायाला फॅक्चर असताना रिषभ पंत लंगडत बॅटिंगसाठी मैदानात उतला होता.
पंतनंतर ओव्हलच्या मैदानात क्रिस वोक्सनं दाखवलेली हिंमत चर्चेचा विषय ठरली.
क्रिस वोक्सनं मैदानात उतरल्यावर एकही चेंडू न खेळता शेवटपर्यंत नॉन स्ट्राइकलाच राहिला.
त्याने एकाही चेंडूचा सामना केला नसला तरी त्याने दाखवलेला 'जज्बा' क्रिकेटच्या इतिहासात एक अविस्मरणीय क्षण जोडणार ठरला.
पण तुम्हाला माहितीये का? क्रिकेटच्या मैदानात याआधी कॅरेबियन खेळाडूनं एका हाताने बॅटिंग केली होती.
१९८४ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या लीड्स कसोटीत माल्कम मार्शल या दिग्गजाने हाताच्या अंगठ्याला फॅक्चर असताना एका हाताने बॅटिंग केली होती.