जाणून घ्या सविस्तर....
IPL मधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंनी टीम इंडियाकडून पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले आहे.
जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेत छाप सोडून अनुभवी खेळाडूही टीम इंडियात कमबॅकसाठी धडपडत असतात.
इथं नजर टाकुयात IPL २०२६ च्या हंगामात खास कामगिरीसह टीम इंडियातील दावेदारी मजबूत करणाऱ्या पाच खेळाडूंवर...
GT चा सलामीवीर साई सुदर्शन याने ८ सामन्यात २ अर्धशतके आणि एका शतकाच्या मदतीने बीसीसीआय निवडकर्त्यांचे लक्षवेधून घेतले आहे.
RCB च्या ताफ्यातील देवदत्त पडिक्कल यानेही आपल्या फलंदाजीची छाप सोडली असून त्यालाही टीम इंडियात संधी मिळू शकते.
ऑलराउंडर क्रुणाल पांड्यानं IPL मधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर टीम इंडियातील आपली दावेदारी भक्कम केली आहे.
स्विंगचा किंग भुवीनं गोलंदाजीतील धमक दाखवून देत पुन्हा एकदा टीम इंडियाकडून मैदानात गाजवण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे.
लखनौ सुपर जाएंट्सच्या ताफ्यातून मोहसिन खान यानेही टीम इंडियाकडून खेळण्यासाठी शड्डू ठोकला आहे.