कुणी कुणाच्या गोलंदाजीवर साधला डाव
UAE विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना स्फोटक बॅटर अभिषेक शर्मानं हैदर अलीच्या पहिल्याच चेंडूवर सिक्सर मारला.
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना पहिल्याच चेंडूवर तुटून पडत षटकार मारणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरलाय.
टी-२० क्रिकेटमधील नंबर वन बॅटरनं दुबईतील UAE विरुद्धच्या सामन्यात १६ चेंडूत ४ चौकार अन् ३ षटकारांच्या मदतीने ३० धावांची खेळी केली.
रोहित शर्मानं २०२१ मध्ये अहदाबादच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आदिल राशीदचं षटकार मारत स्वागत केले होते.
२०२४ मध्ये यशस्वी जैस्वालनं झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० सामन्यात सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.
या यादीत संजू सॅमसनचाही समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध याच वर्षी त्याने जोफ्राच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता.