हे खेळाडू IPL मध्येही आपल्या संघासाठी डोकेदुखी ठरणार? 

IPL आधी फ्रँचायझी संघाचे टेन्शन वाढवणारे हिरो

IPL च्या यंदाच्या हंगामाआधी  टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे काही खेळाडूंनी आपल्या IPL फ्रँचायझी संघाचे टेन्शन वाढवले आहे.

इथं एक नजर टाकुयात अशा ५ खेळाडूंवर ज्यांचा फॉर्म IPL मधील फ्रँचायझीसाठी ठरू शकतो डोकेदुखी

ऑस्ट्रेलियाच्या कॅमरून ग्रीनसाठी कोलकाता नाईट रायडर्सने २५.२० कोटी रक्कम मोजली आहे. 

या स्टार ऑलराउंडरने वर्ल्ड कप स्पर्धेत तीन डावात अनुक्रमे २१, ० आणि ३ धावा केल्या. गोलंदाजीत त्याने एकच विकेट मिळवली. 

न्यूझीलंडचा जेकब डर्फी RCB कडून मैदानात उतरले.  वर्ल्ड कपमध्ये ५ सामन्यात त्याने ३ विकेट्स साठी १० पेक्षा अधिक इकोनॉमीसह धावा खर्च केल्या. 

अभिषेक शर्माने फायनलमध्ये विक्रमी अर्धशतक ठोकले. पण कामगिरीतील सातत्याचा अभाव सनरायझर्स हैदराबादसाठी डोकेदुखी ठरू शकतो. 

जोस बटलरही यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सपशेल अपयशी ठरला. आता गुजरात टायटन्सकडू खेळताना तरी त्याची बॅट तळपणार का? ते पाहण्याजोगे असेल.

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ८ सामन्यात फक्त दोन विकेट्स घेतल्या. IPL मध्ये तो MI कडून मैदानात उतरणार आहे.