अभिषेकनं मोडला मसल पॉवर रसेलचा रेकॉर्ड! जाणून घ्या सविस्तर

भारताच्या युवा बॅटरचा मोठा धमाका

अभिषेक शर्मानं न्यूझीलंडविरुद्धच्या धमाकेदार खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावे केले. 

 त्याने ३३ व्या टी-२० सामन्यात पाचव्यांदा तेही वेगवेगळ्या संघाविरुद्ध सामनावीरचा पुरस्कार पटकवण्याचा खास विक्रमी डावही साधला.

याशिवाय अभिषेक शर्मानं टी-२० क्रिकेटमध्ये चेंडूच्या बाबतीत सर्वात वेगाने ५००० धावांचा पल्ला गाठण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.

भारताच्या युवा स्फोटक बॅटरने फक्त २८९८ चेंडूत ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 

या यादीत कॅरेबियन स्टार ऑलराउंडर आंद्रे रसेल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने हा पल्ला गाठण्यासाठी २९४२ चेंडू खेळले होते. 


इंग्लंडचा स्टार  विल जॅक्स  याने ३१९६ चेंडूत हा पल्ला गाठला होता. 


ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने ३२३९ चेंडूत ५००० धावांचा आकडा पार केला होता. 

Click Here