आघाडीच्या ५ मध्ये ३ भारतीय बॅटर
अभिषेक शर्मा T20I मधील फलंदाजांच्या क्रमवारीत ९०० रेटिंग पॉइंट्सचा टप्पा गाठणारा तिसरा भारतीय ठरला आहे.
इथं एक नजर टाकुयात आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत सर्वोत्तम रेटिंगच्या खास विक्रमावर...
आयसीसीच्या T20I मधील फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वोच्च रेटिंग पॉइंट्सचा रेकॉर्ड हा इंग्लंडच्या डेविड मलानच्या नावे आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मलान याने २०१० मध्ये ९१९ रेटिंगसह अव्वल स्थानावर कब्जा केला होता.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. २०२३ मध्ये तो ९१२ रेटिंग पॉइंट्सपर्यंत पोहचला होता.
विराट कोहलीनं २०१४ मध्ये T20I क्रमवारीत ९०९ रेटिंग पॉइंट्स आपल्या खात्यात जमा केले होते.
आशिया कप स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर अभिषेक शर्मा ICC च्या टी-२० क्रमवारीत ९०७ रेटिंग पॉइंटसह अव्वलस्थानी आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच हा २०१९ मध्ये ९०० रेटिंग पॉइंट्ससह T20 तील आपल्या सर्वोच्च रँकिंगवर पोहचला होता.