जलद अर्धशतकी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला युवीचा विक्रम

IND vs PAK मॅचमध्ये जलद अर्धशतक साजरे करणारे फलंदाज

भारताकडून आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वात जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड आता अभिषेक शर्माच्या नावे झाला आहे. 

IND vs PAK सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकवणाऱ्या  यादीत मोहम्मद हाफिज २३ चेंडूतील अर्धशतकासह (अहमदाबाद २०१२) अव्वलस्थानी आहे. 

या यादीत अभिषेक शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आशिया कप स्पर्धेतील दुबईच्या मैदानातील सुपर फोरच्या लढतीत पाक विरुद्ध त्याने अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक साजरे केले.

युवराज सिंगने २०१२ मध्ये अहमदाबादच्या मैदानात २९ चेंडूत पाक विरुद्ध अर्धशतक झळकावले होते. हा विक्रम अभिषेक शर्मानं मोडलाय.

पाकिस्तानचा इफ्तिखार अहमद याने २०२२ मध्ये मेलबर्नच्या मैदानात टीम इंडियाविरुद्ध ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

२००७ मध्ये डरबनच्या मैदानात मिस्बाह उल हक याने टीम इंडिया विरुद्ध ३३ चेंडूत फिफ्टी साजरी केली होती.   

Click Here