एक नजर खास रेकॉर्डवर...
आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मानं विराट कोहलीच्या विक्रम मोडित काढलाय.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मानं १३ चेंडूत २३८ च्या स्ट्राइक रेटनं पॉवरप्लेमध्ये ३१ धावा कुटल्या.
पाकिस्तान विरुद्ध पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा कुटण्याचा विक्रम आता अभिषेक शर्माच्या नावे झाला आहे.
विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. २८ ऑगस्ट २०२२ रोजी दुबईच्या मैदानात किंग कोहलीनं पॉवर प्लेमध्ये २९ धावा केल्या होत्या.
४ सप्टेंबर २०२२ ला पाकिस्तान विरुद्ध खेळताना रोहित शर्मानं दुबईच्या मैदानातच पॉवर प्लेमध्ये २८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
केएल राहुलनंही ४ सप्टेंबर २०२२ ला रंगलेल्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये २८ धावा केल्या होत्या.
अजिंक्य रहाणेनं २८ डिसेंबर २०१२ मध्ये अहमदाबादच्या मैदानात पॉवर प्लेमध्ये २५ धावा केल्या होत्या.