ओमानच्या ताफ्यातील दोघांची कमाल
आशिया कप स्पर्धेत ओमानच्या संघाने टीम इंडियाला कडवी टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय संघ एकहाती जिंकणं अपेक्षित होतं त्या सामन्यात टीम इंडियानं फक्त २१ धावांनी विजय मिळवला.
भारतीय संघाकडून फक्त संजू सॅमसनच्या भात्यातून अर्धशतक आले. पण ओमानच्या ताफ्यातून दोन बॅटर्संनी अर्धशतकी डाव साधत इतिहास रचला.
३३ चेंडूत ५१ धावांच्या खेळीसह ओमानचा हमीद मिर्झा असोसिएट मेंबर्स संघाकडून टीम इंडियाविरुद्ध ५० पेक्षा अधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.
टीम इंडियाविरुद्ध पहिले अर्धशतक झळकावत इतिहास रचणारा आमिर कलीम याने त्याच्या आधि अर्धतक झळकावत हा डाव साधला.
लिंबू टिंबू संघाकडून टीम इंडियाविरुद्ध रुबाब झाडत आमिर कलीमनं कमाल केली.
२०१० च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचा संघाक़ून नूर अली झादरान याने टीम इंडियाविरुद्ध ४८ चेंडूत ५० धावांची खेळी केली होती.