कॅमेरामनची एक फ्रेम अन् इंटरनेटवर फक्त तिचीच चर्चा
क्रिकेट सामन्यादरम्यान अनेकदा कॅमेरा काही अशा प्रेक्षकांकडे जातो की ते रातोरात 'सोशल मीडिया सेन्सेशन' बनतात.
भारत पाक सामन्यात अशीच एक 'मिस्ट्री गर्ल' व्हायरल झाली, जिचे नाव राजवी गांधी आहे.
हाय-व्होल्टेज सामन्यादरम्यान स्टँड्समध्ये बसलेली तरुणी कॅमेऱ्यात कैद झाली. तिच्या सौंदर्याने अनेकांचे लक्ष वेधले.
काही तासांतच "Who is this mystery girl?" असे ट्रेंड सुरू झाले आणि अखेर ती राजवी गांधी असल्याचे समोर आलं.
राजवी गांधी ही एक प्रख्यात डिजिटल कंटेंट क्रिएटर आणि फॅशन इन्फ्लुएन्सर आहे.
तिने 'अपॅरल मॅन्युफॅक्चरिंग आणि डिझायनिंग' मध्ये पदवी पूर्ण केली आहे, ज्यामुळे तिला फॅशन क्षेत्रातील तांत्रिक जाण आहे.
राजवीने आपल्या प्रवासाची सुरुवात टिकटॉकवरून केली होती. तिथे तिला 'स्टाईल बॅज' देखील मिळाला होता.
सध्या इन्स्टाग्रामवर तिचे १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती प्रामुख्याने फॅशन, ब्युटी टिप्स आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स शेअर करते.
२०१८ मध्ये 'YONO SBI 20 Under 20' या प्रभावी तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला होता.