भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचा विवाह पलाश मुच्छल याच्यासोबत २३ नोव्हेंबर रोजी होणार होता. पण तिच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने तिचं लग्न रद्द करण्यात आलं.
स्मृती मानधनाच्या बाबांचं नाव श्रीनिवास मानधना आहे. ते स्वत: एक क्रिकेटपटू होते आणि त्यांनी सांगलीसाठी क्रिकेट खेळलं आहे. ते व्यवसायाने केमिकल डिस्ट्रिब्युटर आहे, तर आता तिचे बाबा सांगलीत SM18 कॅफे चालवतात.
स्मृती मानधनाच्या आईचं नाव स्मिता मानधना आहे. त्या गृहिणी आहेत.
स्मृतीच्या क्रिकेट कारकिर्दीत तिच्या आई-वडिलांनी तिला संपूर्ण पाठिंबा दिला.
स्मृती मानधनाला मोठा भाऊ आहे, ज्याचं नाव श्रवण मानधना आहे. श्रवण मानधनाने देखील महाराष्ट्रसाठी अंडर-१९ क्रिकेट खेळलं आहे. आता तो बँकर असून SM18 कॅफे व टर्फची जबाबदारीही सांभाळतो.
स्मृतीने तिच्या भावाला क्रिकेट खेळताना पाहिलं आणि त्यानंतर तिने क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. ती ४ वर्षांची असल्यापासून तिच्या वडिलांबरोबर भावाचा सराव पाहायला जात होती.
स्मृतीचा भाऊ श्रवणचं लग्न झालं असून त्याच्या पत्नीचं नाव कधी समोर आलं नाही. श्रवणने १० जुलै २०१८ ला लग्न केलं.
श्रवणला एक मुलगा आहे ज्याचं नाव ह्रिनय मानधना आहे. त्याचा जन्म ९ ऑक्टोबर २०२१ रोजी झाला. स्मृतीच्या लग्नापूर्वीच्या विधींमध्ये तो अनेकदा बागडताना दिसला आहे.