महिला क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न उद्या सांगलीत होणार आहे.
महिला क्रिकेटर स्मृती मानधना नेहमीचं चर्चेत असते. ती भारतीय संघाची सलामी फलंदाज आहे. स्मृती मानधनाला नॅशनल क्रशही म्हटले जाते.
स्मृतीचे अनेक चाहते आहेत. तिचं शिक्षण काय झालेय? याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
स्मृती मानधनाचा जन्म 18 जुलै 1996 रोजी मुंबईतील मारवाडी कुटुंबात झाला. ती दोन वर्षाची असताना कुटुंबीय माधवनगर सांगलीला शिफ्ट झालं होतं.
स्मृती मानधना हिने आपले शालेय शिक्षण सांगलीतूनच केलेय. त्याशिवाय पदवीचे शिक्षणही सांगलीच्या चिंतामनराव कॉलेज ऑफ कॉमर्स येथून पूर्ण केलेय.
स्मृतीने आंतरराष्ट्रीय कसोटीत 13 ऑगस्ट 2014 रोजी पदार्पण केले होते.
तर वनडेमध्ये 10 एप्रिल 2013 रोजी बांग्लादेशविरोधात पदार्पण केलेय. स्मृतीने 5 एप्रिल 2013 रोजी टी20 मध्ये पदार्पण केलेय.
स्मृतीने 2014 मध्ये इंग्लंडच्या विरोधात कसोटी पदार्पण केले होते.
या सामन्यात स्मृतीने दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलियाविरोधात पहिले वनडे शतक झळकावलं होतं.