चमकणारी ट्रॉफी नेमकी आहे तरी कशी? पाहा खास वैशिष्ट्ये
टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे बिगुल वाजले असून ७ फेब्रुवारीपासूनच्या स्पर्धेत २० संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.
या ऐतिहासिक सोहळ्यापूर्वी,विश्वचषकाच्या झळाळत्या ट्रॉफीची सर्वत्र चर्चा होत आहे. ही ट्रॉफी पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत.
ही ट्रॉफी दिसायला चांदीची वाटत असली, तरी ती बनवण्यासाठी ५ वेगवेगळ्या धातूंचा वापर करण्यात आला आहे.
या ट्रॉफीची निर्मिती लंडनमधील एका कंपनीने २०२१ मध्ये केली होती. याच कंपनीने चॅम्पियनशिपची गदा देखील तयार केली आहे.
सुरवातीला वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे वजन तब्बल १२ किलो असायचे. मात्र, नेण्यास सुलभ व्हावे यासाठी आता तिचे वजन कमी करण्यात आले.
सध्याचे वजन ३.९ किलो असून त्याची उंची ५१ सेंटीमीटर आहे. या ट्रॉफीचा पाया पूर्णपणे 'सिल्व्हर प्लेटेड' आहे.
आयसीसी आणि ट्रॉफी बनवणाऱ्या कंपनीने या ट्रॉफीची अधिकृत किंमत कधीही जाहीर केलेली नाही. पण, ती अमूल्य मानली जाते.
जो संघ विश्वविजेता ठरतो, त्याला ही खरी ट्रॉफी कायमस्वरूपी दिली जात नाही. विजेता संघ मैदानात फक्त खऱ्या ट्रॉफीसह सेलिब्रेशन करतो.
त्यानंतर संघाला या ट्रॉफीची रेप्लिका सोपवली जाते. मूळ ट्रॉफी दुबईच्या आयसीसीच्या मुख्य कार्यालयात सुरक्षित ठेवली जाते.