आशियाई क्रिकेटमधील सर्वात मोठी लढाई आशिया कपमध्ये होते.
यावेळी आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला जाईल. आशिया कप टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज कोण आहेत ते जाणून घेऊया.
मोहम्मद नवाज यादीत नवव्या क्रमांकावर आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये फक्त आठ विकेट्स घेतल्या आहेत.
आठव्या क्रमांकावर पाकिस्तानचा शादाब खान आहे, त्याने पाच सामन्यांमध्ये आठ विकेट्स घेतल्या आहेत.
सातव्या क्रमांकावर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आहे. त्याने सहा सामन्यांमध्ये नऊ विकेट्स घेतल्या आहेत.
सहाव्या क्रमांकावर बांगलादेशचा अल-अमीन हुसेन आहे, त्याने पाच सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहेत.
पाचव्या क्रमांकावर भारताचा हार्दिक पंड्या आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहेत.
अफगाणिस्तानचा रशीद खान चौथ्या स्थानावर आहे, त्याने आठ सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहेत.
युएईचा मोहम्मद नवीद तिसऱ्या स्थानावर आहे त्याने सात सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहेत.
दुसऱ्या स्थानावर युएईचा अमजद जावेद आहे. त्याने सात सामन्यांमध्ये १२ विकेट घेतल्या आहेत.
या यादीत माजी भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार अव्वल स्थानावर आहे. त्याने फक्त सहा सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेतल्या आहेत.