रोहित शर्माने त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक नवीन कार अॅड केली आहे.
रोहित शर्माने त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक नवीन लॅम्बोर्गिनी उरुस स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. ही कार पूर्वीपेक्षा अधिक अपग्रेड केलेली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक नवीन लॅम्बोर्गिनी उरुस स्पोर्ट्स कार अॅड केली आहे.
गेल्या आयपीएल हंगामात, त्याने त्याची जुनी निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी उरुस कार आयपीएल फॅन्टसी स्पर्धेतील विजेत्याला भेट दिली.
आता रोहितने पुन्हा एकदा लॅम्बोर्गिनी उरुसची नवीन अपग्रेडेड व्हर्जन उरुस 'एसई' खरेदी केली आहे.
लाँचच्या वेळी, त्याची सुरुवातीची किंमत ४.५७ कोटी रुपये होती आणि ती हायब्रिड पॉवरट्रेनसह येते.
रोहित शर्माच्या या नवीन लॅम्बोर्गिनी उरुस कारच्या डिलिव्हरीचा व्हिडिओ यूट्यूब चॅनलने शेअर केला आहे.
ही नारंगी रंगाची कार रोहित शर्माच्या मागील निळ्या लॅम्बोर्गिनी उरुसपेक्षा थोडी वेगळी दिसते.
कंपनीने या कारमध्ये ४.० लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिन दिले आहे. जे ६२०hp पॉवर आणि ८००Nm टॉर्क जनरेट करते.
प्लग-इन हायब्रिड सिस्टमने सुसज्ज असलेल्या या कारमध्ये २५.९ किलोवॅट क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक देखील आहे. जो इंजिनला अतिरिक्त रेंज देण्यास मदत करतो.
८-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज असलेली ही कार ८०० एचपीची एकत्रित पॉवर जनरेट करते.
उरुस एसई फक्त इलेक्ट्रिक मोडमध्ये सुमारे ६० किमी ड्रायव्हिंग रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे.
ही कार फक्त ३.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे. तिचा टॉप स्पीड ३१२ किमी प्रतितास आहे.