महेंद्रसिंह धोनीची बाईक्सची आवड सर्वश्रुत आहे.
माजी कर्णधार एमएस धोनीच्या रांचीमधील फार्महाउसमध्ये एक भलेमोठे गॅरेज आहे, ज्यात 100 हून अधिक बाईक्सचे मोठे कलेक्शन आहेत.
धोनीची सर्वात पहिली बाईक Yamaha RD350 होती. काही रिपोर्ट्सनुसार, धोनीला ही गाडी इतकी आवडते की, त्याने Yamaha RD350 चे सहा मॉडेल्स खरेदी केले आहेत.
धोनीकडे Confederate Hellcat X132 बाईक आहे. ही बाईक अद्वितीय आणि दुर्मिळ आहे. तिचे उत्पादन खूप मर्यादित असते. या बाईकची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे.
धोनीकडे Kawasaki Ninja ZX-14R सुपरबाईकदेखील आहे. यामध्ये 1,441 cc, 4 सिलिंडर इंजिन आहे, जे 200 hp पॉवर जनरेट करते. याची टॉप स्पीड 300 km/h आहे.
धोनीकडे Kawasaki Ninja H2 देखील आहे. तो या बाईकचा भारतातील पहिला मालक आहे. याची एक्स शोरुम किंमत 35 लाख रुपये आहे.
धोनीच्या गॅरेजमध्ये Harley-Davidson Fat Boy देखील आहे. यात 1,690 cc एयर कूल्ड, V-Twin इंजिन आहे. याची भारतातील किंमत 17 लाख रुपये आहे.
धोनीकडे ड्युकाटी 1098 देखील आहे, ज्याची किंमत ₹25 लाख रुपये आहे. या लिमिटेड एडिशन बाईकमध्ये 1098 सीसी इंजिन आहे, जे 160 पीएस एनर्जी जनरेट करते.
याशिवाय धोनीकडे इतर अनेक लक्झरी बाईक्स आहेत, ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. धोनी अनेकदा रांचीमध्ये आपल्या बाईकवर फेरफटका मारताना दिसतो.