रोहित VS विराट; टी२० मध्ये अधिक चौकार अन् शतकं कुणाची...?

जाणून घ्या...

भारताचे धडाकेबाज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. ते आता केवळ एकदिवसीय क्रिकेटच खेळत आहेत.

आज आम्ही आपल्याला रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्ये एकूण किती चौकार आणि शतके ठोकली आहेत, यासंदर्भात माहिती देत आहोत.

सर्वप्रथम रोहित शर्मा... रोहितने १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय तर आतापर्यंत २७२ आयपीएल सामने खेळले आहेत.

रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३८३ चौकार आणि आयपीएलमध्ये ६४० चौकार ठोकले आहेत. अर्थात त्याने एकूण १,०२३ चौकार ठोकले आहेत.

शतकांसंदर्भात बोलायचे झाल्यास, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये रोहितने ५ तर आयपीएलमध्ये २, अशी एकूण ७ शतके झळकावली आहेत.

विराट कोहली संदर्भात बोलायचे झाल्यास, त्याने १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने आणि आतापर्यंत २६७ आयपीएल सामने खेळले आहेत.

कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३६९ चौकार तर आयपीएलमध्ये आतापर्यंत ७७१ चौकार ठोकले आहेत. अर्थात कोहलीने एकूण १,१४० चौकार ठोकले आहेत.

कोहलीच्या शतकांसंदर्भात बोलायचे झाल्यास, त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १ तर आयपीएलमध्ये ८, अशी एकूण ९ शतके ठोकली आहेत.

अर्थात, चौकार आणि शतकांच्याही बाबतीत कोहली रोहितच्या पुढे आहे. रोहितच्या तुलनेत कोहलीचे ११७ चौकार अधिक आहेत, तसेच त्याने २ शतकेही अधिक ठोकली आहेत.

गायीला शिळे अथवा उष्टे अन्न का देऊ नये? काय होतं? जाणून घ्या...

Click Here