९ सप्टेंबरपासून Asia Cup 2025 सुरू होत आहे.
Asia Cup 2025 सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याचा नवीन लूक समोर आला आहे.
हार्दिक पंड्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर त्याच्या नवीन लुकचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये त्याने केसांना सोनेरी रंग लावल्याचे दिसत आहे. नवीन लुकमध्ये हार्दिकला ओळखणेही कठीण आहे.
हार्दिकने वेगवेगळ्या पोझमध्ये त्याच्या नवीन लूकचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
पंड्या बऱ्या दिवसानंतर मैदानात परतणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
आता आशिया कप २०२५ मधील हार्दिकची कामगिरी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची असणार आहे.