धोनीसोबतही खेळला! एका चुकीमुळे तो ७ वर्षे संघाबाहेर राहिला

ऑस्ट्रेलियन दिग्गजाची अनटोल्ड स्टोरी

डेमियन मार्टिन या ऑस्ट्रेलियन दिग्गज क्रिकेटरचा जन्म २१ ऑक्टोबर १९७१ मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ या शहरात झाला.

 आक्रमक फलंदाजीच्या जोरावर या  दिग्गजाने वयाच्या २१ व्या वर्षी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून वनडे आणि कसोटीत पदार्पण केले होते. 

२००३ आणि २००७ च्या वनडे वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग असलेला हा दिग्गज बेजबाबदार फटका खेळल्यामुळे ७ वर्षे संघाबाहेर राहावे लागले. 

१९९३-९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत संघाला विजयासाठी ७ धावांची गरज असताना विकेट फेकल्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागली. 

७ वर्षांनी  मार्टिन  संयमी आणि परिपक्व होऊन परतला. ६७ कसोटीत त्याच्या खात्यात ४४०६ धावा तर वनडेत २०८ सामन्यात ५३४६ धावा जमा आहेत.

मार्टिन याने धोनीसोबतचा फोटो शेअर करत एका चॅरिटी सामन्यात एकत्र खेळल्याची खास गोष्ट शेअर केली होती. 

२००६-०७ च्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर रंगणाऱ्या तिसऱ्या सामन्याआधी त्याने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती.

Click Here