रुट वेगानं करतोय सचिनचा पाठलाग!
सचिन तेंडुलकर हा कसोटीतील शतकांचं अर्धशतक झळकवणारा पहिला आणि एकमेवर फलंदाज आहे. त्याच्या खात्यात ५१ शतकांची नोंद आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ४५ शतके झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने कसोटीत १३ हजार ३७८ धाावा करताना ४१ शतके झळकावली आहेत.
जो रुटनं ऑस्ट्रेलियन मैदानात पहिले शतक झळकावत कसोटीत ४० शतके झळकवण्याचा पल्ला गाठला.
श्रीलंकेच्या कुमार संगकारा याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३८ शतके झळकावली आहेत.
क्रिकेट जगतातील पहिला ब्रँढ ब्रायन लारा याने कसोटी कारकिर्दीत ३४ शतके झळकावली आहेत. नाबाद ४०० ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
कसोटीत १० हजार धावांचा पल्ला गाठणारे पहिले बॅटर सुनील गावसकर यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत ३४ शतके झळकावली आहेत.
पाकिस्तानचा युनिस खान ३४ शतकांसह टॉप टेनमध्ये आठव्या स्थानावर आहे.
'मिस्टर डिपेंडेबल' राहुल द्रविड याने कसोटीत खास छाप सोडताना ३६ शतके झळकवल्याचा रेकॉर्ड आहे.
ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ३६ शतके झळकावली आहेत.