पीएफचे पैसे आता एटीएमने काढा, दिवाळीपूर्वीच मिळणार लाखो सदस्यांना सुविधा
सदस्यांना विशेष एटीएमकार्ड मिळणार; पाहा कसे काढता येतील पैसे?
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) दिवाळीपूर्वी एटीएममधून पैसे काढण्याची तसेच बँकेसारखी सुलभ व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करीत आहे.
कामगार व रोजगारमंत्रीमनसुखमांडविया यांच्या अध्यक्षतेखाली दि. १० व ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्याईपीएफओच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
बैठकीचा अजेंडा निश्चित झालेला नाही. मात्र, सुमारे ८ कोटी ईपीएफओ सदस्यांना दिवाळीपूर्वी काही नवीन सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांच्या खर्चाच्या पद्धतींमध्ये सुधारणा घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सध्याच्या नियमांनुसार, वैद्यकीय उपचार, शैक्षणिक खर्च, विवाह किंवा घरासाठी ईपीएफमधील पैसे काढता येतात. स्वयंचलित पद्धतीने पाच लाखांपर्यंत रक्कम काढण्यास परवानगी आहे. हे व्यवहार तीन दिवसांत पूर्ण होतात.
याशिवाय त्यासाठी मानवी हस्तक्षेप लागत नाही. एनईएफटी किंवा आरटीजीएस वापरले जाते. एटीएमद्वारे पैसे काढण्याचा प्रस्ताव हा ईपीएफओच्या आधुनिकीकरण मोहिमेचा भाग आहे.
नवीन प्रक्रियेत, AYM ईपीएफओ त्यांच्या ग्राहकांना एक विशेष एटीएमकार्ड जारी करेल, जे त्यांच्या पीएफ खात्याशी जोडलं जाईल. या कार्डचा वापर करून, ग्राहक त्यांचे पीएफ पैसे थेट एटीएममशीनमधून काढू शकतील.
यूपीआयमधून पैसे काढण्यासाठी, खातेदारांना त्यांचं पीएफ खातं यूपीआयशी लिंक करावे लागेल. यानंतर, ते त्यांच्या बँक खात्यात पीएफचे पैसे ट्रान्सफर करू शकतील. यामुळे तात्काळ पैसे काढता येणार आहेत.
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?