या क्रेडिट कार्डद्वारे अनेक कामे सहजपणे पूर्ण करता येतात.
क्रेडिट कार्डचा वाढता वापर!आजकाल क्रेडिट कार्डचा वापर खूप वाढलाय. एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणारे अनेकजण आहेत.
फायद्यांमुळे लोकप्रियता!क्रेडिट कार्ड म्हणजे एक प्रकारे कर्जच, पण त्यावर मिळणाऱ्या ऑफर्स आणि सवलतींमुळे ते खूप लोकप्रिय झाले आहे.
जगातील सर्वात महागडे कार्ड!जगातील सर्वात महागडे क्रेडिट कार्ड म्हणजे अमेरिकन एक्सप्रेस सेंचुरियन कार्ड. याला अमेक्स ब्लॅक कार्ड असेही म्हणतात.
केवळ निमंत्रणाने मिळते!हे कार्ड प्रत्येकाला मिळत नाही. जगातील केवळ १ लाख आणि भारतात फक्त २०० श्रीमंत लोकांना खास निमंत्रणाद्वारेच हे मिळते.
खरेदी मर्यादा १० कोटी रुपये!या कार्डची खरेदी मर्यादा तब्बल १० कोटी रुपयांपर्यंत आहे, म्हणजे तुम्ही एका झटक्यात इतकी मोठी खरेदी करू शकता!
वार्षिक शुल्क ६ लाख रुपये!या कार्डचे वार्षिक शुल्क ६ लाख रुपये आहे, जे सामान्य माणसाच्या बजेटबाहेरचे आहे.
लक्झरी सुविधांचा अनुभव!प्रीमियम रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, विमान प्रवास, आणि अगदी खाजगी जेट बुकिंगसारख्या सुविधाही या कार्डवर मिळतात.
२०१३ मध्ये भारतात लाँच!हे खास कार्ड २०१३ मध्ये भारतात लाँच करण्यात आले होते, तेव्हापासून ते श्रीमंतांसाठी स्टेटस सिम्बॉल बनले आहे.
श्रीमंतांसाठी खास कार्ड!केवळ पैशानेच नाही, तर विशिष्ट जीवनशैली असणाऱ्या व्यक्तींसाठी हे अमेरिकन एक्सप्रेस सेंचुरियन कार्ड खऱ्या अर्थाने एक लक्झरी स्टेटमेंट आहे.