मोदींचा युके दौरा अन् व्हिस्की प्रेमींची कळी खुलली

भारत आणि युकेमध्ये अनेक व्यापारी करार झाले आहेत. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड किंगडमच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावर भारत आणि युकेमध्ये अनेक व्यापारी करार झाले आहेत. 

यामधील एक सर्वात महत्वाचा करार म्हणजे भारतानं युकेमधून आयात करण्यात येणाऱ्या व्हिस्की उत्पादनांवरचा टॅरीफ कमी करण्यात आला आहे. 

यामुळं युकेच्या स्कॉच व्हिस्कीला एक मोठी बाजारपेठ मिळणार आहे. भारतातील व्हिस्की प्रेमींना देखील इम्पोर्टेट व्हिस्कीचा स्वस्तात उपभोग घेता येणार आहे. 

भारत हा व्हिस्कीची जगातील सर्वात मोठी उपभोग बाजापेठ आहे. २०२४ मध्ये भारतातील व्हिस्कीचे मार्केट ३० अब्ज डॉलर्स इतकं होतं. 

मात्र स्कॉट व्हिस्कीची यातील हिस्सेदारी ही फक्त २ ते ३ टक्के इतकीच होती. मात्र आता भारत आणि युके यांच्यातील करारामुळं ही हिस्सेदारी वाढणार आहे. 

जाणकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार स्कॉच व्हिस्कीची हिस्सेदारी ५ ते ७ टक्के होण्याची शक्यता आहे. याचा फायदा अनेक ब्रँड्सना होण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी युकेमधून आयात करण्यात येणाऱ्या स्कॉचवर १५० टक्के टॅरीफ लावण्यात येत होता. आता तो ७५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. 

त्यामुळे आता युकेची प्रीमियम स्कॉच व्हिस्की भारतात जवळपास अर्ध्या दरात मिळू शकते. 

नव्या फॉरेन ट्रेड अॅग्रिमेंटनुसार व्हिस्कीसोबतच कपडे, दागिने, कृषी उत्पादने, बाईक यांच्या देखील किंमती उतरणार आहेत. 

Click Here